म. टा. वृत्तसेवा, मिरा भाईंदर

या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या सर्वेक्षणामध्ये देशातील दहा कर्तृत्ववान महिलांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भाईंदरच्या उत्तन येथे राहणाऱ्या यांच्या सामाजिक कार्याची दखल घेण्यात आली आहे. शहराचे नाव फोर्ब्सच्या जागतिक दर्जाच्या मासिकात झळकल्यामुळे सर्वच स्तरातून अॅगाथा यांचे कौतुक केले जात आहे.

अॅगाथा यांचा जन्म राजस्थान येथील अजमेर येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना समाजकार्याची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी निर्मला निकेतन या सामाजिक कार्य या विषयातून पूर्ण केले आहे. १९९५च्या दरम्यान या सामाजिक कार्य करत असताना त्यांना मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी स्वतःचा एक अनाथ आश्रम व शाळा असावी, असा विचार करून ११९६ साली भाईंदरच्या उत्तन येथे ‘आमचं घर’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत मुलींना राहण्याची, भोजनाची, इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची, तसेच त्यांचे पूर्ण संगोपन संस्थेमार्फत करण्यास सुरुवात करण्यात आली. अॅगाथा यांच्या संस्थेकडून प्रशिक्षण, विद्यार्थी निवास व्यवस्था, शाळा, बालवाडी, महापालिकेला सहकार्य, तलासरी डहाणू येथील आदिवासी भटक्या जमातीसाठी व मुलांसाठी इंग्रजी माध्यमातून बालवाडी, नालासोपारा येथे संस्थेमार्फत उपजीविका प्रकल्प, माध्यमिक विभागातील मुलांसाठी शिष्यवृत्ती, वैद्यकीय सहाय्यता योजना व जेष्ठ नागरिकांना योजना यांसारखे उपक्रम राबवले जातात. या सामाजिक कार्याची दखल घेत फोर्ब्स या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या सर्वेक्षणामध्ये भारतातील दहा कर्तृत्वान महिलांमध्ये अॅगाथा यांची निवड करण्यात आली आहे.

शहराचे नाव फोर्ब्सच्या जागतिक दर्जाच्या मासिकात अॅगाथा यांच्या सामाजिक कार्यामुळे झळकल्याने मिरा-भाईंदरचा महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी त्यांचा नुकताच सत्कार केला. दुर्लक्षित घटकांसाठी जेवढे कार्य केले जाईल तेवढे कमीच आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. रस्त्यावर आयुष्य जगणाऱ्या लहान मुलांना एका छत्राखाली सुविधा प्राप्त करून देण्यासाठी हे सर्व प्रयत्न केले जात आहेत. संस्थेकडून १०० हून अधिक मुलींना उच्च शिक्षण देण्यात आले आहे. यातील काही मुली परदेशात नोकरी करत आहेत. फोर्ब्स या आंतरराष्ट्रीय मासिकाने आमच्या संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल घेतली असली, तरी येणाऱ्या काळात आणखी मोठ्या प्रमाणावर कशा प्रकारे अनाथ मुलींना शिक्षण देत आत्मनिर्भर करता येईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती अॅगाथा यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here