मुंबई: ‘रिपब्लिक टीव्ही’चे मालक, संपादक यांच्या अटकेनंतर भाजपने राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला घेरले आहे. विशेषत: शिवसेनेला लक्ष्य केले आहे. अर्णव यांच्या अटकेनंतर दिल्लीतील भाजप नेत्यांनी महाराष्ट्र सदनाबाहेर उद्धव ठाकरे आणि इंदिरा गांधी यांचे पोस्टर झळकावून आणीबाणीची आठवण करून दिली. शिवसेनेनं प्रथमच त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ( by BJP)

‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपच्या या पोस्टरबाजीवर भाष्य करताना शिवसेनेनं इंदिरा गांधी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. भाजपवाल्यांचे डोके कामातून गेले असल्याची घणाघाती टीकाही केली आहे. ‘दिल्लीच्या रस्त्यांवर उद्धव ठाकरे व इंदिरा गांधी यांची पोस्टर्स चिकटवून आणीबाणीची आठवण लोकांना करून देणे हा बालिशपणा तर आहेच, पण अज्ञानसुद्धा आहे. इंदिरा गांधींशी तुलना होणे ही गौरवाचीच बाब आहे. भारताच्या फाळणीचा सूड याच पोलादी स्त्रीने पाकिस्तानची फाळणी करून घेतला. असे धाडस पाकिस्तानच्या बाबतीत एकाही ‘मर्द’ म्हणवून घेणाऱ्या राज्यकर्त्यास दाखवता आले नाही,’ असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.

वाचा:

‘आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव जरूर झाला, पण त्याच इंदिरा गांधींना देशाच्या जनतेने पुन्हा विजयी केले. देशाच्या अखंडतेसाठी इंदिराजींनी शेवटी प्राणाचे बलिदान दिले. असा दुर्दम्य त्याग नंतर एखाद्या तरी पंतप्रधानाने केला असेल तर दाखवा. भाजपने दिल्लीच्या रस्त्यावर इंदिराजी व उद्धव ठाकरे यांचे एकत्र चेहरे लावले असतील तर त्याचे स्वागत आहे. यानिमित्ताने त्यांनी पाळण्यात बसून पुन्हा इतिहासाचे वाचन करायला हवे. म्हणजे सदोष मनुष्यवध प्रकरणातील आरोपीच्या समर्थनार्थ दंडास काळ्या पट्ट्या आणि पायांत गुलामीचे घुंगरू बांधून नाचायची वेळ येणार नाही,’ अशी बोचरी टीका शिवसेनेनं केली आहे.

वाचा:

पंतप्रधान, राष्ट्रपती, लष्करप्रमुख, राज्यपाल अशा पदांवरील व्यक्तींचा एकेरी आणि ‘अरे-तुरे’च्या भाषेत जाहीर उद्धार केलेला भाजपला चालणार असेल तर त्यांनी तसे सांगावे. म्हणजे त्यांच्या दंडावरील काळ्या पट्ट्यांचे आम्हीही स्वागत करू. अमित शहा, मोदी वगैरे नेत्यांशी मतभेद असू शकतात. म्हणून ‘एकेरी’वर जाऊन त्यांच्यावर चिखलफेक करणे आम्हाला मान्य नाही. ही ‘ट्रम्प’ संस्कृती भारतात कोणी रुजवत असेल तर त्यांनी अमेरिकेत सुरू झालेल्या अराजकाकडे डोळसपणे पाहायला हवे. तसे अराजक कोणाला हिंदुस्थानात हवे आहे काय?,’ असा प्रश्नही शिवसेनेनं केला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here