मुंबई:‘ हे खूप मोठे नेते आहेत, पण ते आपला डाव खेळलेत. बिहारची जनता या क्षणाचीच वाट बघत होती. याच निवडणुकीत जनता त्यांना सन्मानाने रिटायर करून टाकेल,’ असा टोला शिवसेनेचे खासदार यांनी आज हाणला. ( on )

बिहारच्या निवडणुकीसाठी आज अखेरच्या टप्प्याचं मतदान होत आहे. बिहारच्या सत्तेतून भाजप-संयुक्त जनता दल आघाडीला उखडून फेकण्यासाठी राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस व डाव्या पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांनीही नितीशकुमार यांना लक्ष्य करत विरोधकांना बळ दिलं आहे. दुसरीकडं, भाजप आणि जेडीयू सत्ता टिकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. आपल्या एका सभेत नितीश कुमार यांनी बिहारी जनतेला भावनिक आवाहन केलं होतं. ही माझी अखेरची निवडणूक आहे. त्यामुळं जनतेनं मला आशीर्वाद द्यावा, असं ते म्हणाले.

वाचा:

संजय राऊत यांनी मुंबईत ‘एएनआय’शी बोलताना त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘नितीश कुमार हे खूप मोठे नेते आहेत. त्यांचा आम्ही नेहमीच आदर केला आहे. ते आपला डाव खेळलेत. जर कोणी नेता म्हणत असेल की ही माझी शेवटची निवडणूक आहे तर त्या नेत्याला सन्मानाने निरोप द्यायला हवा. बिहारची जनता याच निरोप समारंभाची वाट पाहत होती. मला वाटतं या निवडणुकीत लोक त्यांना रिटायर्ड करून टाकतील,’ असं राऊत म्हणाले.

फारूक अब्दुल्लांनाही सुनावले!

‘पाकिस्तानात जायचे असते तर १९४७ सालीच गेलो असतो. पण भारत हा आमचा देश आहे. महात्मा गांधींचा देश आहे. भाजपचा नाही. आमचे हक्क मिळत नाहीत तोपर्यंत मरणार नाही,’ असं फारूक अब्दुल्ला यांनी म्हटलं होतं. त्यावर, अब्दुल्लांची इच्छा असेल तर ते पाकिस्तानात जाऊन तिथं कलम ३७० लागू करू शकतात. भारतात कलम ३७० व ३५ अ ला जागा नाही,’ असं राऊत म्हणाले.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here