सांगली: राजकारणात सगळी धडपड ही मिळवण्यासाठीच सुरू असते असं म्हटलं जातं. मात्र, राज्याचे उद्धव ठाकरे यांनी वेगळे उदाहरण निर्माण करून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला. मुख्यमंत्री सांगलीतील वाळवा तालुक्यातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. उद्घाटनानंतर इमारतीची पाहणी करण्यासाठी ते कार्यालयात पोहोचले. तिथे त्याना तहसीलदाराच्या खुर्चीवर बसवण्यात आले. मात्र, बसल्यानंतर ही तहसीलदारांची खुर्ची असल्याचे समजताच मुख्यमंत्री त्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी सन्मानाने खुर्चीवर तहसीलदाराला बसवले. मुख्यमंत्र्यांच्या या वागणुकीमुळे त्यांचे कौतुक होत आहे.

‘ही खुर्ची तुमची आहे’

मुख्यमंत्री खुर्चीवरून उठले आणि समोर उभे असलेले नेते आणि मोठ्या अधिकाऱ्यांच्या गर्दीत उभे असलेले तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या जवळ गेले. मुख्यमंत्र्यांनी तहसीलदाराला खुर्चीपर्यंत आणले. त्यांनी विचारले, ‘ तुम्हीच तहसीलदार आहात ना?. मग ही खुर्ची तुमच्यासाठी आहे, तुम्हीच या खुर्चीवर बसा.’

उद्धव यांची साधी वागणूक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सहज आणि साधी वागणूक पाहून सर्वजणांनी त्यांची प्रशंसा केली आहे. मात्र, जेव्हा जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, मंत्री, राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळे शिष्टाचाराचा भाग म्हणून तहसीलदार खुर्चीवर बसण्यास तयारच होईनात तेव्हा खरी गम्मत आली. मी या खुर्चीवर कसे बरे बसू शकतो, असे तहसीलदार नम्रपणे म्हणाले. तेव्हा मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘ही इमारत तुमची आहे, इथले प्रमुख अधिकारी या नात्याने तुम्हाला काम करायचे आहे, ही खुर्ची तुमची आहे, या खुर्चीवर मी स्वत: तुम्हाला बसवत आहे.’

तहसीलदार खुर्चीवर बसले

शेवटी तहसीलदार रवींद्र सबनीस यांना खुर्तीवर बसावे लागले. मुख्यमंत्री त्यांच्या शेजारी उभे राहिले. त्यानंतर या कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य लोकांशी देखील अधिकारी चांगला व्यवहार करतील, त्यांचा यथोचित सन्मान करतील, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री तर उद्घाटन करून निघून गेले. मात्र, त्यानंतर जेव्हा जेव्हा मी या खुर्चीवर बसलो, तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री माझ्या बाजूला उभेच आहेत असे मला वाचत राहते, असे तहसीलदार संबनीस यांनी सांगितेल. मुख्यमंत्र्यांचा सुसंस्कृतपणा, साधेपणा आणि त्यांनी आमचा केलेला सन्मान यामुळे सर्व कर्मचारी प्रभावित झाले आहेत. या सन्मानामुळे आमचे काम पूर्ण जबाबदारीने करण्याची प्रेरणा आम्हाला मिळत राहील, असेही सबनीस म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here