मुंबई: वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना समुद्रकिनारी नग्नावस्थेत धावणं प्रसिद्ध अभिनेता व मॉडेल याला महागात पडलं आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case Registered against )

मिलिंद सोमण यानं ४ नोव्हेंबर रोजी आपला ५५ वा वाढदिवस साजरा केला. धावण्याची आवड असलेला व फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या मिलिंदनं गोव्याच्या बीचवर धावून वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुरुवात केली. मात्र, धावताना त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तो पूर्ण नग्नावस्थेत धावला. मिलिंदची पत्नी हिने त्याची ही छबी कॅमेऱ्यात टिपली. हे एवढ्यावरच थांबलं नाही. मिलिंदने चक्का त्याचा हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. मिलिंदची पत्नी अंकितानंही एक सेल्फी इन्स्टावर शेअर केला.

वाचा:

मिलिंद सोमणच्या या अनोख्या सेलिब्रेशनचं अनेकांनी कौतुक केलं. तर, काहींनी त्यावर टीका केली. आता त्याच्यावर कलम २९४ अश्लिल चाळे केल्याचा व गाणं गायल्याचा व कलम ६७ अंतर्गत सोशल मीडियावर अश्लिल साहित्याचा प्रसार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here