पाटणा : दरम्यान शेवटच्या टप्प्यातल्या मतदानापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेड (JDU) चे अध्यक्ष (CM ) यांनी ‘अंतिम निवडणूक’ असल्याची घोषणा करत मतदारांच्या भावनेला हात घातला होता. याचवरून विरोधी लोक जनशक्ती पक्षाचे नेते (LJP) आणि राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते यांनी मुख्यमंत्र्यांवर दुहेरी हल्ला चढवलाय.

‘नितीश कुमार आता पुन्हा मुख्यमंत्री पदावर आरुढ होऊ शकणार नाहीत’ अशी प्रतिक्रिया तिसऱ्या टप्प्यापूर्वी चिराग पासवान () यांनी दिलीय. ‘बिहारचे लोक बिहार फर्स्ट आणि बिहारी फर्स्ट संकल्पनेशी जोडून राहतील’ अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

‘या टप्प्यातही लोक जनशक्ती पक्षाचं पारडं जड राहील परंतु, एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे नितीश कुमारजी यानंतर पुन्हा कधीही मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत’ असं चिराग पासवान यांनी म्हटलं.

वाचा : वाचा :

दुसरीकडे तेजस्वी यादव यांनीही मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन करत ‘बिहारची जनता बिहारच्या भविष्याचा निर्णय घेत’ असल्याचं म्हटलंय. ‘नितीश कुमार आता थकलेत. राज्याचं नेतृत्व करण्यात ते आता सक्षम नाहीत’ अशी टीकाही तेजस्वी यादव () यांनी मुख्यमंत्र्यांवर केलीय.

राज्यातील एकूण २४३ मतदारसंघांपैंकी तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात आज १५ जिल्ह्यांतील ७८ विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडतंय. या टप्प्यात आज सकाळी ११ वाजेपर्यंत १९.७४ टक्के मतदानाची नोंद करण्यात आलीय.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here