करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी फटाकेमुक्त दिवाळीची संकल्पना मांडण्यात येत आहे. आरोग्य मंत्री यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर त्यावर युवा नेत्यांकडूनही मते व्यक्त झाली आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या भूमिकेचे स्वागत केले तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी मोठ्या आवाजाचे आणि जास्त धूर सोडणाऱ्या फटाक्यांवर थेट बंदीचीच मागणी केली.
वाचा:
यावर आता नगरच्या फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, फक्त फटाक्यांमुळेच प्रदूषण होते का? ही भूमिका मांडणाऱ्यांनी ते सिद्ध करून दाखविले आहे का? याशिवाय प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या अन्य घटकांसंबंधी अशी भूमिका घेतली जाणार का? असे सवाल त्यांनी केले आहेत.
वाचा:
फटाक्यांचे समर्थन करताना बोज्जा म्हणाले की, दिवाळी हा हिंदू धर्माचा सर्वांत मोठा सण आहे. या दिवशी गरीब आणि श्रींमतही आपापल्या परीने फक्त दोन-तीन तास फटाके वाजवून आनंद व्यक्त करीत असतात. त्यातून असे कितीसे प्रदूषण होणार? या उलट गाड्यांचा धूर, कचरा पेटविण्यामुळे होणारा धूर यांचे सतत आणि जास्त प्रदूषण होत असते. शिवाय फटाका व्यावसायात अनेक कुटुंब आहेत. त्यांची उपजीविका त्यावर अवलंबून आहे. बंदी घातली तर त्यांची उपासमार होईल. आजकाल वेगवेगळे फटाके आले आहेत. कमी आवाज, कमी धूर करणारे फटाकेही आले आहेत.
वाचा:
तांबे यांची प्रदूषण विरोधी भूमिका योग्य आहे. पण केवळ फटाके नव्हे तर अन्य घटकांचाही त्यांनी विचार करावा. फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी करताना त्यांनी फटाक्यांमुळेच प्रदूषण होते, हे सिद्ध करून दाखवावे. याशिवाय या व्यावसायात असलेल्या कुटुंबांचाही विचार करावा, असेही बोज्जा यांनी म्हटले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times