मुंबई: अमेरिकेची निवडणूक आणि मुंबई पोलिसांचा थेट काय संबंध?… हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे मुंबई पोलिसांनी आज केलेलं एक भन्नाट ट्वीट. अवघ्या काही शब्दांचं आणि काही आकड्यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल झालं आहे. ()

हे सातत्यानं सोशल मीडियाद्वारे जनजागृती करत असतात. त्यासाठी अनोख्या शक्कल लढविल्या जातात. करोना लॉकडाऊनच्या काळातही मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरून असे अनेक ट्वीट केले होते. आज पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी एक मार्मिक ट्वीट केलं आहे. पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकाबद्दल हे ट्वीट आहे. कुठल्याही थेट व तातडीच्या तक्रारीसाठी १०० क्रमांकावर डायल करून पोलिसांची मदत घेता येते. मध्यंतरी हा क्रमांक बदलणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. १०० ऐवजी ११२ या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू होणार असल्याची चर्चा होती. मात्र, ती केवळ चर्चाच राहील, असं मुंबई पोलिसांच्या नव्या ट्वीटवरून दिसून येतंय. हा क्रमांक कधीच बदलणार नाही, असं मुंबई पोलिसांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

वाचा:

पण मग या ट्वीटचा अमेरिकेच्या निवडणुकीशी किंवा निकालाशी काय संबंध असा प्रश्न पडतो. तर, त्याचं उत्तर आहे नुकतेच जाहीर झालेले अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून ज्यो बायडेन व डोनाल्ड ट्रम्प या उमेदवारांना अनुक्रमे २६४ व २१४ एवढ्या जागा मिळाल्या आहेत. मात्र, निकाल अद्याप घोषित झालेला नाही. वेगवेगळ्या कारणांमुळं गेल्या जवळपास दोन दिवसांपासून दोन्ही उमेदवारांचे आकडे ‘जैसे थे’ आहेत. त्यावरून सोशल मीडियावर अनेक मीम्स केले जात आहेत. मुंबई पोलिसांनी १०० नंबरचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या आकड्यांचा आधार घेतला आहे.

‘बायडेन – २६४, ट्रम्प – २१४ आणि मुंबई पोलीस – १००’ हे आकडे कधीच बदलणार नाहीत, असं ट्वीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. #Dial100 #WinningSafety हे हॅशटॅगही ट्वीटमध्ये वापरण्यात आले आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here