नवी दिल्लीः बिहार निवडणुकीच्या ( bihar election ) तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज संपलं. तिसर्‍या टप्प्यात बिहारमध्ये ५४.५७ टक्के मतदान झालं. ३ नोव्हेंबरला दुसर्‍या टप्प्यात ५५.७० टक्के मतदान झालं आणि पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबरला ५५.६९ टक्के मतदान झालं. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर आता टाइम्स नाउ- C Voter चा ( ) जाहीर झाला आहे.

टाइम्स नाउ-सी वोटरच्या सर्वेक्षणानुसार एनडीएला ११६ जागा, महाआघाडीला १२०, तर एलजेपीला १ आणि इतरांना ६ जागा मिळतील, असा अंदाज आहे. बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए आणि आरजेडीच्या नेतृत्वातील महाआघाडीत जोरदार टक्कर दिसून येत आहे. या सर्वेक्षणात एनडीएसाठी ११६ जागा आणि महाआघाडीसाठी १२० जागांचा अंदाज आहे. तर एलजेपीला १ तर इतरांना ६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. बहुमतासाठी १२२ जागांची आवश्यकता आहे. यामुळे सत्ता स्थापनेसाठी जोरदार रस्सीखेच बघायला मिळू शकते.

बिहार निवडणुकीत यावेळी करोना संकटाच्या काळात वाढलेली बेरोजगारी आणि स्थलांतरीत मजुरांच्या मुद्द्यासह अनेक मुद्दे गाजले. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारच्या तरुणांना सत्तेत आल्यानंतर १० नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलंय. यामुळे तरुणांना तेजस्वी यादव यांच्याकडे आकर्षित झाले आहेत. तर मुख्यमंत्री नितीश यांनी आपल्या सरकारच्या विकासकामांचा पाढा वाचला. निवडणूक प्रचारादरम्यान जेडीयू-भाजप युती आणि महाआघाडीत आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्या होता. लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या काळात बिहारमध्ये जंगलराज कसे होते, हे सांगून सत्ताधारी युतीने हल्ला चढवला. जनतेचा विश्वास कोणावर आहे? हे १० नोव्हेंबरपर्यंत लागणाऱ्या निकालातून स्पष्ट होईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here