मुंबईः मराठा समाजाच्या प्रश्नावर तातडीने मार्ग काढावा यासाठी मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आंदोलकांनी मातोश्रीवर धडक देण्याची तयारी केली आहे. वांद्रे येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यान गेटवर मोठ्या संख्येंन मराठा आंदोलक जमले आहेत.

मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी काढण्यात आला. आज संध्याकाळी पाच वाजता वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयापासून हा मोर्चा काढण्यात आला असून यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी वांद्रे येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यान गेटवर पोलिस आणि मराठ आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याचीही माहिती आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याच्या मागणीवर मराठा कार्यकर्ते आडून बसले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पुढच्या आठवड्याची वेळ दिली आहे. मात्र, कार्यकर्त्यांना ही वेळ मान्य नसल्यानं मुख्यमंत्र्यांनी किंवा अनिल परब यांनी भेट द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. जोपर्यंत कोणी भेट देत नाही त्यांनी तोपर्यंत या मोर्चाचा समारोप होणार नाही, अशी भूमिका मराठा कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

पोलिसांनी चर्चा करण्यासाठी वेळ मागितली आहे. मात्र, मराठा आंदोलक व समन्वयक हे आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असून जो पर्यंत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here