नवी दिल्ली : काहीही झाले तरी पाकिस्तानचे क्रिकेटपटू मात्र सुधारलेले पाहायला मिळत नाहीत. सध्याच्या घडीला पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा गोलंदाज वहाब रियाझने आयसीसीचा नियम मोडल्याचे पाहायला मिळाले. पण रियाझची ही गोष्ट पंचांसाठी मात्र डोकेदुखी ठरली. रियाझच्या चुकीनंतर पंचांना नेमके काय करावे लागले, याचा व्हिडीओ सध्याच्या घडीला व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

ही गोष्ट झिम्बाब्वेची फलंदाजी असताना ११ व्या षटकात पाहायला मिळाली. त्यावेळी झिम्बाब्वेची ३ बाद ७७ अशी अवस्था होती. त्यावेळी रियाझने आयसीसीचा नियम मोडत चेंडूला चकाकी आणण्यासाठी आपल्या थुंकीचा वापर केला. करोनानंतर चेंडूला चकाकी आणण्यासाठी थुंकी, लाळ लावू नये, असा नियम आयसीसीने सुरक्षेच्या कारणास्तव बनवलेला होता. पण या नियमाचे पालन न करता रियाझने यावेळी चेंडूला थुंकी लावल्याचे पाहायला मिळाले.

रियाझने यावेळी चेंडूला थुंकी लावल्याचे पंचांनी पाहिले. त्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. पंचांनी यावेळी रियाझ आणि पाकिस्तानच्या संघाला ताकिद दिली. त्यानंतर पंचांना तो चेंडू डिसइनफेक्ट करावा लागला. त्यासाठी पंचांनी पहिल्यांदा चेंडू मैदानात खाली ठेवला. त्यानंतर त्यांनी राखीव पंचांना बोलावले आणि चेंडू साफ करून घेतला. त्यानंतरच हा चेंडू खेळण्यासाठी देण्यात आला. त्यामुळे पंचांसाठी रियाचझी ही चूक डोकेदुखी ठरल्याचे पाहायला मिळाले. यापुढे जर वहाबकडून अशीच चूक झाली तर त्याच्यावर आयसीसीच्या नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

झिम्बाब्वेचा संघ सध्याच्या घडीला पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये तीन ट्वेन्टी-२० सामने खेळवण्यात येणार आहे. यामधील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेला पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने निर्धारीत २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावत १५६ धावा केल्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने या आव्हानाचा पाठलाग करताना ८२ धावांची दमदार खेळी साकारली. त्यामुळेच पाकिस्तानने हा सामना ४ विकेट्स गमावून १८.५ षटकांतच जिंकला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here