वॉशिंग्टन: संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार हे अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा त्यांनी पराभव केला आहे. बायडन यांना २८४ तर ट्रम्प यांना २१४ इतकी इलेक्टोरल मते मिळाली. अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडन विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. बायडन यांना सात कोटींहून अधिक मते मिळाली. बायडन यांच्या विजयामुळे अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी कमला हॅरीस यांनी निवड होणार आहेत. आफ्रो-अमेरिकन वंशाच्या कमला हॅरीस आता अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती असणार आहेत. मतमोजणीच्या मुद्यावरून ट्रम्प यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अमेरिकेतील सत्ता संघर्षाचा पुढील अंक कोर्टात रंगण्याची चिन्हं आहेत.

डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात चुरस कायम होती. स्विंग स्टेटमध्ये बायडन यांनी दमदार कामगिरी करताना ट्रम्प यांना जोरदार धक्का दिला. अखेरच्या टप्प्यात जॉर्जिया, पेन्सिलवेनिया, नॉर्थ कॅरिलोना आणि नेवादा या राज्यांच्या हाती सत्तेची चावी होती. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात बायडन नेवादात आघाडीवर होते. तर, ट्रम्प इतर तीन राज्यांमध्ये आघाडीवर होते. मात्र, मतमोजणी वाढू लागल्यानंतर अखेरच्या टप्प्यात बायडन यांनी मारली. डेमोक्रॅटीक पक्षाने तब्बल २८ वर्षांनी जॉर्जिय आपल्याकडे खेचून आणले.

वाचा:

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यावेळी प्रत्यक्ष मतदानाऐवजी अनेकांनी पोस्टल मतदानाला प्राधान्य दिले. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा पोस्टल मतदान करणाऱ्यांची संख्या जवळपास ७० टक्के अधिक होती. अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार याची शक्यता याआधीच व्यक्त करण्यात आली होती. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन या दोन्ही उमेदवारांनी स्विंग स्टेटसमधील प्रचारावर भर दिला होता. डेमोक्रॅटीक आणि रिपब्लिक या दोन्ही पक्षांचे बालेकिल्ले असलेले राज्ये आहेत. तर, जवळपास १२ राज्ये ही स्विंग स्टेट म्हणून ओळखली जातात. मागील निवडणुकीत १२ पैकी ८ राज्यांमध्ये ट्रम्प यांनी विजय मिळवला होता. यंदा मात्र, त्याची पुनरावृत्ती करण्यात त्यांना अपयश आले.

वाचा:

बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना जो बायडन यांच्याकडे उपराष्ट्रपतीपदाची जबाबदारी होती. बायडन यांना मिळालेली मते ही आतापर्यंतची सर्वाधिक मते आहेत. याआधी बराक ओबामा यांना २००८ च्या निवडणुकीत सहा कोटी ९४ लाख मते मिळाली होती.

वाचा: वाचा:
>> सत्ता संघर्ष कोर्टात?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा संघर्ष आता कोर्टात पोहचला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावतीने मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला असून कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. जो बायडन यांनी मतमोजणीत पिछाडीवरून आघाडी घेतलेल्या राज्यांमध्ये ट्रम्प यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. जॉर्जिया आणि मिशिगनमध्ये ट्रम्प यांच्यावतीने मतमोजणीतील कथित गैरप्रकाराविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, कोर्टाने या यचिका फेटाळून लावल्या. ट्रम्प यांच्याकडून फेडरल कोर्टात दाद मागण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here