सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे डॉक्टारांनी नातेवाईकांना आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, सायंकाळी त्यांना रुग्णालयात आणण्यात आले, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नियमानुसार याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात येऊन पुढील तपास सुरू केला आहे. मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.
गौरी या यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत यांच्या पत्नी होत. तर राज्याचे जलसंधारण मंत्री यांच्या भावजयी होत्या. गौरी यांचे माहेर लोणी (ता. राहाता) येथील आहे. त्या थेट राजकारणात सक्रीय नसल्या तरी पती प्रशांत यांनी स्थापन केलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात त्या कार्यरत होत्या.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times