बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबरला म्हणजे पुढच्या आठवड्यात मंगळवारी लागणार आहे. या निकालापूर्वी अनेक संस्था आणि वृत्त वाहिन्यांनी बिहार निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर केला. टाइम्स नाउ- सी वोटर, इंडिया टुडे -अॅक्सिस, रिपब्लिक जन की बात, टुडे्स चाणक्य, ईटीजी आणि टीव्ही ९ भारतवर्ष यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलमध्ये बहुतेकांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस महाआघाडीच्या बाजून कल दिला आहे.
सर्वच एक्झिट पोलमध्ये एनडिला महाआघाडीच्या तुलनेत कमी जागा दाखवण्यात आल्या आहेत. टाइम्स नाउ-सी वोटरनुसार नितीशकुमार, भाजपच्या एनडीएला ११६ जागा तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेस महाआघाडीला १२० आणि इतरांना ७ जागांचा अंदाज दिला आहे. इंडिया टुडे-अॅक्सिसनुसार एनडीएला ८० तर महाआघाडीला १५० जागा आणि इतरांना ४ जागांचा अंदाज आहे. रिपब्ल्कि जन की बातनुसार एनडीए १०४ आणि महाआघाडी १२८ तर इतरांना १२ जागा मिळतील. टडे्स चाणक्यच्या अंदाजानुसार एनडीए ५५, महाआघाडी १८० तर इतरांना ८ जागा मिळतील. ईटीजीच्या अंदाजानुसार ११४, एनडीएला १२० आणि इतरांना ९ जागा मिळतील. टीव्ही ९ भारतवर्षने एनडीए ११५, महाआघाडी १२० आणि इतरांना ८ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times