जो बायडन यांना डेमोक्रॅटीक पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी कमला हॅरीस यांची उपराष्ट्रपतीपदासाठी निवड केली. त्यावेळी जो बायडन यांनी कमला हॅरीस यांना बहाद्दूर योद्धा म्हटले होते. कमला हॅरीस या कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल म्हणून काम करत असताना त्यांची कामाची पद्धत पाहिली आहे. त्यांनी अनेक मोठ्या बँकांना आव्हान दिले होते. काम करणाऱ्या लोकांची त्यांनी मदत केली आहे. महिला व बालकांना शोषणापासून त्यांनी वाचवले आहे. मला त्यावेळीदेखील मला त्यांचा अभिमान वाटत होता आणि आताही अभिमान वाटत असल्याची भावना बायडन यांनी व्यक्त केली होती.
वाचा: वाचा:
आजोबांचा प्रभाव
१९६४ मध्ये जन्म झालेल्या कमला हॅरीस यांनी आपला लहानपणीचा बराच काळ हा आजोबांसोबत (आईचे वडील) घालवला. आजोबा पी. व्ही. गोपालन झांबिया येथे राहणारे होते. गोपालन हे भारत सरकारचे अधिकारी होते. त्यांना झिम्बाब्वेच्या शरणार्थींच्या नोंदी आणि इतर कामासाठी पाठवण्यात आले होते. त्यावेळी झिम्बाब्वे नुकताच ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता. माझे आजोबा हे माझ्या आवडीच्या लोकांपैकी एक असल्याचे कमला हॅरीस यांनी याआधीही सांगितले आहे.
वाचा:
आईकडून गिरवले सामाजिक चळवळीचे धडे
कमला हॅरीस यांची आई श्यामला गोपालन यांनी आपल्या मुलांची नाळ भारतासोबत जुळलेली असावी यासाठी प्रयत्न केले. तामिळ वंशाच्या भारतीय-अमेरिकन श्यामला या नावाजलेल्या कॅन्सर संशोधक आणि सक्रिय कार्यकर्त्या होत्या. त्यांनी आपल्या मुलींचे नामकरण संस्कृतमधीन केले. कमला हॅरीस यांच्यावर त्यांच्या आईचा मोठा प्रभाव आहे. स्थलांतर, समान अधिकाराच्या मुद्यावर कमला हॅरीस यांची मते ही त्यांच्या आईसारखीच आहे. श्यामला गोपालन यांचे पदवी शिक्षण दिल्लीतून झाले. श्यामला ह्या फक्त संशोधकच नव्हे तर मानवाधिकार कार्यकर्त्या म्हणूनही सक्रिय होत्या.
विद्यार्थी जीवनात चळवळीत सक्रिय
कमला यांनी हार्वर्ड विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला. हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांनी कॅलिफोर्नियातील तत्कालीन सिनेटर अॅलन क्रॅस्टन यांच्यासाठी मेलरूम क्लर्क म्हणून काम केले. त्यावेळी अॅलन यांनीदेखील राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. १९९० च्या सुमारास कमला हॅरीस यांनी आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि डेप्युटी डिस्ट्रिक्ट अटर्नी म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
वाचा:
२०१६ मध्ये रचला इतिहास
कमला हॅरीस या २००३ ते २०११ दरम्यान सन फ्रॅन्सिस्कोच्या ड्रिस्ट्रिक्ट अटर्नी म्हणून कार्यरत होत्या. २०१६ मध्ये त्यांनी रिपब्लिकन सिनेटर लोरेटा सानशेज यांचा पराभव करत अमेरिकन सिनेटमध्ये कनिष्ठ प्रतिनिधी म्हणून निवडून आल्या. अमेरिकन काँग्रेसच्या अप्पर चेंबरपर्यंत निवड होणाऱ्या हॅरीस या दुसऱ्या कृष्णवर्णीय आणि पहिल्या दक्षिण आशियाई-अमेरिकन महिला होत्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times