अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अमेरिकेतील प्रमुख वृत्तसंस्थांनी बायडन यांना विजयी घोषित केलं. यानंतर बायडन यांनी पहिल्यांदाच आपलं मत व्यक्त केलं. अमेरिकेच्या जनतेने आपल्यावर आणि कमला हॅरीस यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मला सन्मानित आणि गौरव झाल्यासारखा वाटतोय, असं बायडन म्हणाले.
‘अनेक अडथळ्यांचा सामोरे जात अमेरिकेच्या जनतेने मोठ्या संख्येने मतदान केलं. लोकशाही अमेरिकेच्या हृदयात खोलवर रुजली आहे, हे यातून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. प्रचार संपल्यानंतर ही वेळ आता संताप आणि कठोर वक्तव्य सोडून एक राष्ट्र म्हणून सर्वांनी एकत्र येण्याची आहे. ही अमेरिकेला एकजूट करण्याची आहे, असं आवाहन बायडन यांनी केलं.
बायडन खोटं बोलून जिंकले, ट्रम्प यांची टीका
बायडन यांच्या विजयानंतर अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निवेदन जारी केलंय. यात ट्रम्प यांनी बायडन यांच्यावर टीका केलीय. बायडन हे खोटं बोलून निवडणूक जिंकले हे आपल्या सर्वांना माहिती आहे. खोटं बोलून त्यांनी मिळवलेल्या विजयात त्यांचे सहकारी का त्यांना साथ देत आहेत, हे समजत नाहीए. कदाचित सत्य उघड होऊ नये, हेच त्यांना हवं आहे, असं ट्रम्प म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times