नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष यांचं विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. तसंच उपराष्ट्राध्यक्ष निवड झाल्याबद्दल भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांनाही मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. बायडन-हॅरीस प्रशासनासह भारत-अमेरिका संबंध नवीन उंची गाठतील, अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या ४६ व्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन हे निवडून आलेत. पंतप्रधान मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. ‘भव्य विजयाबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. भारत-अमेरिका संबंधांसाठी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून तुम्ही यापूर्वी दिलेलं योगदान कौतुकास्पद होतं. आता तुम्ही राष्ट्राध्यक्ष झाल्याने भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर काम करण्यात आनंद होईल’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

‘भारतीय-अमेरिकी जनतेसाठी अभिमानाचा क्षण’

पंतप्रधान मोदींनी आणखी एक ट्विट केलं. उपराष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांचं अभिनंदन केले. ‘तुमचं यश प्रेरणादायक आहे. हा केवळ आपल्या नातलगांसाठीच नव्हे तर सर्व भारतीय-अमेरिकेच्या जनतेसाठी अभिमानाचा क्षण आहे. मला आशा आहे की भारत-अमेरिका संबंध तुमच्या नेतृत्वात आणि सहकार्याने नवीन उंची गाठतील’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल शनिवारी रात्री लागले. या निवडणुकीत जो बायडन विजयी झाले. त्यांनी अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. जानेवारी २०२१ मध्ये व्हाईट हाउसची सूत्र आता जो बायडन यांच्याकडे जाणार आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here