राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या १३९ व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनाची मानवंदना शनिवारी भदौरिया यांनी स्वीकारली. त्यानंतर ते बोलत होते. लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती, एनडीएचे प्रमुख ले. जनरल असित मिस्री, उपप्रमुख रिअर अॅडमिरल अतुल आनंद आदी उपस्थित होते.
एनडीएच्या या १३९ व्या तुकडीतून ३०२ छात्र प्रशिक्षण संपवून बाहेर पडले. यामध्ये लष्कराच्या २२२, नौदलाच्या ४५ आणि हवाई दलाच्या ३५ छात्रांचा समावेश होता. तर यापैकी १७ छात्र हे मित्रदेशांमधील होते. सर्वोत्तम छात्र म्हणून बटालियन कॅडेट कॅप्टन अनिरूद्ध सिंह याने राष्ट्रपतींचे सुवर्णपदक पटकावले. द्वितीय क्रमांकासाठी डिव्हिजनल कॅडेट कॅप्टन सोमय बदोला याने राष्ट्रपतींचे रौप्यपदक तर तृतीय क्रमांकासाठीचे राष्ट्रपतींचे कांस्यपदक बटालियन कॅडेट कॅप्टन अनमोल याने पटकावले. प्रतिष्ठेचा चीफ ऑफ स्टाफ बॅनर इंडिया स्क्वाड्रनने पटकावला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times