भाजप असणार सर्वात मोठा पक्ष
दैनिक भास्करच्या चाचणीनुसार, बिहारमध्ये एनडीएला १२० ते १२७ जागा मिळतील. या चाचणीमुळे नीतीश कुमार यांना काहिसा दिलासा मिळाला आहे. असा दावा करणारी दैनिक भास्करची एकमेव चाचणी आहे. भास्करच्या जनमत चाचणीनुसार बिहारमध्ये जनता दल संयुक्तच्या तुलनेत भाजप चांगल्या स्थितीत असणार आहे. भाजपला ६३ ते ६५ जागा मिळू शकतात. तर, जनता दल संयुक्तला ५८ ते ६३ जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच महाआघाडीमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाला ५२ ते ६० जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसच्या खात्यात १९ ते २७ जागा जाऊ शकतात.
क्लिक करा आणि वाचा-
चिराग पासवान देखील मजबूत स्थितीत
अनेक मोठ्या जनमत चाचण्यांनी चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाच्या खात्यात ७ ते ७० जागा दाखवल्या आहेत. मात्र भास्करच्या जनमत चाचणीमध्ये चिराग पासवान यांना १२ ते २३ जागा दाखवल्या आहेत. भास्करच्या चाचणीनुसार, जर लोक जनशक्ती पक्षाला १२ ते २३ जागा मिळाल्या तर गेल्या १५ वर्षांत पक्षाला पहिल्यांदाच दोन अंकी जागा मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये एनडीएची स्थिती चांगली नव्हती, मात्र दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान महाआघाडीसाठी फार फायद्याचे नसल्याचे भास्करच्या चाचणीत म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times