शुक्रवारी सकाळी पीडित २ वर्षीय मुलगी व तिचा सात वर्षांचा भाऊ नातेवाइकांकडे जात होते. १२ वर्षीय मुलाने दोघांना रस्त्यात अडविले. त्याने पीडितेच्या भावाला मास्क घालून येण्यास सांगितले. तो मास्क आणण्यासाठी घरी गेला. संधी साधून मुलगा मुलीला घेऊन मोकळ्या जागेत गेला. तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. काही वेळाने त्याने मुलीला सोडले. मुलगी रडत घरी आली. मुलीच्या नातेवाइकांना संशय आला. त्यांनी वाडी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.
मुलाने २ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी शोध घेऊन मुलाला ताब्यात घेतले. तो सातव्या वर्गात शिकतो. त्याचे वडील चालक आहेत. अन्य एका मुलाने मुलीला घेऊन आणायला सांगितले होते, असे ताब्यात घेतलेल्या मुलाने पोलिसांना सांगितले. पोलीस त्या मुलाचाही शोध घेत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times