मुंबईः करोनाच्या साथीबरोबरच राज्यात घडत असलेल्या विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या भाषणाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आज दुपारी १. ३० वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात घडत आहेत. कंगना राणावत, अर्णब गोस्वामी यांची अटक तर, गोस्वामींच्या अटेकवरून विरोधकांनी केलेली राज्य सरकारवर टीका. या सगळ्या घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलणार का, याबद्दल उत्सुकता आहे.

राज्यात करोना साथीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश येत आहे. असं असलं तरी आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी कोणती खबरदारी घ्यायची व कोणत्या खबरदारी घेण्याची गरज आहे? असे अनेक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आहेत. त्यामुळं आजचा मुख्यमंत्र्यांचा संवाद अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

शिवाय, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंदिरे व लोकल सुरु करण्याची मागणी करण्यात येत आहे. लोकलसाठी सरकारने रेल्वेला प्रस्तावही पाठवला आहे. मात्र, अद्याप सर्वांसाठी लोकल सुरु करण्यावर अद्यापही कोणता ठोस निर्णय घेण्यात आला नाहीये. दिवाळी सणाच्या तोंडावर लोकल सुरु करणार का? असाही प्रश्न विचारण्यात येत आहे. तर, यावरही आज मुख्यमंत्री बोलणार काकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर मिशन बिगिन अंतर्गंत अनेक सेवांना सूट देण्यात आली आहे. नाट्यगृह, सिनेमागृह, मेट्रो, ग्रथांलय या सेवांना परवनागी दिल्यानंतर आता मंदिरांनाही परवानगी देण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे. या मंदिरं खुली करण्याच्या मागणीवरून अनेक आंदोलनंही करण्यात आली होती. त्यामुळं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मंदिरांबाबत काही निर्णय घेणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here