म.टा. प्रतिनिधी, नगरः अमेरिकेत झालेल्या सत्ता बदलाचे आता देशाच्या राजकारणात पडसाद उमटत आहेत. यावरून भाजपवर निशाणा साधण्याची संधी विरोधकांनी साधली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी यांचे ट्विट एका कमेंटसह रिट्विट केले.

हे म्हणजे “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन” सारखंच झालं… अशी ही कमेंट असून त्यावरून एक प्रकारे तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन विजयी झाले आहेत. तर , दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘मी ही निवडणूक जिंकली बरेच काही करून !’ ( I WON THIS ELECTION, BY A LOT !) अशा आशयाचे एक ट्विट केले आहे.

ट्रम्प यांचे हे ट्विट सत्यजीत तांबे यांनी, ‘हे म्हणजे “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन” सारखंच झालं… अशी कमेंट करीत रिट्विट केले आहे. त्यावरून तांबे यांनी एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here