मुंबईः पाश्चिमात्य देशांत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आली आहे. मात्र, आपल्या राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची वेळ येऊ नये यासाठी आतापासूनच काळजी घेण्याची गरज आहे.,अशा सूचना मुख्यमंत्री यांनी दिल्या. आज मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेसोबत संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी राज्यात करोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी प्रार्थनाही केली आहे.
राज्यात करोना संसर्गाचा वेग आता कमी होत आहे. पण, दिवाळीच्या काळात पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे. यामुळं दिवाळीत फटाक्यांचा वापर न करण्याचा संकल्प करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times