दोन दिवसांपासून एनसीबीनं अनेक ड्रग्ज डिलर्सच्या घरी छापे मारून कारवाई करणं सुरू केलं होतं. या प्रकरणी एनसीबीनं आतापर्यंत पाच ड्रग डिलर्सना ताब्यात घेतलं आहे. या ड्रग डिलर्सच्या चौकशीदरम्यान या मोठ्या निर्मात्याचं नाव समोर आल्याचं म्हटलं जात आहे. काल म्हणजेच शनिवारी एनसीबीनं मुंबई आणि नवी मुंबईतील अनेक ठिकाणी छापे मारले. या छाप्यात मोठ्या प्रमाणात गांजा आणि एडी या प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.
कोण आहेत फिरोज नाडियाडवाला ?फिरोज यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केली आहे.फिर हेरा फेरी, आवारा पागल दीवाना, आन: मेन एट वर्क, फूल अॅन्ड फायनल, वेलकम, कारतूस यांचा समावेश आहे
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगलची चौकशी करणार्या नारकोटिक्स कन्ट्रोल ब्यूरो (एनसीबी) च्या पथकानं काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचा भाऊ अॅगिसिओस डेमेट्रिएडस याला अटक केली आहे. त्याच्याकडून एनसीबीने हशीष आणि अल्प्रझोलमच्या गोळ्या ताब्यात घेतल्या आहेत. अमली पदार्थांच्या प्रकरणात ड्रग्ज पेडलर्सच्या अटकेमुळे अॅगिसिओलोसची ड्रग्स डीलिंगमधली भूमिका समोर आली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times