मुंबईः मुख्यमंत्री यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं आहे. फटाक्यांमुळं करोना वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर, त्यांनी राज्यातील मंदिरे का खुली करत नाहीत? याचे कारण ही स्पष्ट केलं आहे.

राज्यात लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून प्रार्थनास्थळे बंदे आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मंदिरे उघडण्याची मागणीही जोर धरु लागली. सर्वसामान्यांसाठी मंदिरे खुली करण्यासाठी विरोधी पक्षांकडून आंदोलनंही करण्यात आली. यासर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाष्य केलं आहे.

‘मंदिरं कधी उघडणार असं मला गेल्या महिन्यांपासून विचारलं जात आहे. मंदिरे उघडणार ना. पुढच्या आठवड्याच दिवाळी आहे. त्यानंतर नियामावली तयार करु मगच मंदिरं उघडली जातील. असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. घरातील आजी- आजोबा तसंच, जेष्ठ नागरिक मंदिरात जात असतात. करोनाच्या संकटामुळं त्यांना आपण आतापर्यंत जपत आलो आहोत. त्यांच्या काळजीपोटी धार्मिस्थळं उघडण्यात थोडा उशीर होत आहे. पण तरीही माझ्यावर टीका होतेय. पण महाराष्ट्रासाठी माझ्यावर टीका झाली तरी मला चालेल. हा वाईटपणा घ्यायला मी तयार आहे,’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.

वाचाः

‘धार्मिकस्थळं उघडण्याची नियमावली सोपी आहे. मंदिरात जातानाही तोंडाला मास्क लावून जायचं आणि मंदिरात कमीत कमी गर्दी करायची, हीच मंदिरांसाठीची नियमावली असणार आहे. मात्र, याबाबत घाई करून चालणार नाही,’ असंही ते म्हणाले आहेत.

वाचाः

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here