जळगाव शहरातील बळीराम पेठेत भाजपचे ” हे जिल्हा कार्यालय आहे. हे कार्यालय शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले. या घटनेत कार्यालयाचा मुख्य दरवाजा जळून खाक झाला आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या घटनेबाबत भाजपकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने दरवाजासमोरील कचरा जाळल्याने हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता भाजपच्या कार्यकर्त्यांनी वर्तवली आहे.
हा प्रकार एका माथेफिरूने केल्याचा संशय आहे. मागच्या आठवड्यात भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीप्रसंगी या माथेफिरूने शिवीगाळ करत दगडफेकही केली होती. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी संशयित माथेफिरुला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times