दुबई: संयुक्त अरब अमिरातीने मोठा ऐतिहासिक निर्णय घेत इस्लामिक पर्सनल लॉमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यामुळे आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहता येणार आहे. त्याशिवाय मद्य सेवनावरील निर्बंध शिथील केले असून ऑनर किलिंगच्या प्रकरणांना गुन्हा समजला जाणार आहे.

इस्लामिक पसर्नल लॉमध्ये केलेले हे बदल अमिरातीमधील शासकांनी बदलत्या काळानुसार उचललेली पावले असल्याचे समजले जात आहे. त्याशिवाय अमेरिकेच्या मध्यस्थीबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, युएई आणि इस्रायल दरम्यान संबंध अधिक चांगले व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही नमूद करण्यात आले आहे. यामुळे युएईमध्ये इस्रायली पर्यटकांची संख्या वाढून गुंतवणुकीचे मार्ग मोकळे होणार आहेत.

वाचा: मुस्लिमांना मद्यबाबत सवलत

शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या नियमांनुसार, आता मद्याबाबतच्या नियमांतही शिथिलता आणण्यात आली आहे. वय वर्षे २१ हून अधिक असलेल्या व्यक्तींना मद्य सेवन करण्यास, बाळगण्यास अथवा विक्री केल्यास दंडात्मक कारवाई होणार नाही. याआधी मद्य खरेदी करणे, त्याची वाहतूक करणे, घरात ठेवण्यासाठी परवाना घेणे आवश्यक होते. नव्या नियमांनुसार, ज्या मुस्लिमांवर मद्यसेवन करण्यास निर्बंध होते, त्यांना परवानगी देण्यात आली आहे.

वाचा:
‘लिव्ह इन…’ साठी परवानगी
लग्नाशिवायही जोडप्यांना एकत्र राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. युएईमध्ये याआधी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा गंभीर गुन्हा होता. मात्र, दुबईमध्ये हा नियम परदेशी नागरिकांसाठी प्रशासनाकडून शिथिल होता. मात्र, शिक्षा होण्याचा धोका कायम होता.

वाचा:

त्याशिवाय ऑनर किलिंगच्या प्रकरणाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनर किलिंग करणाऱ्या व्यक्तीला संरक्षण देणाऱ्या नियमात बदल करण्यात आले आहेत. जुन्या कायद्यानुसार, आपल्या घराची, कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळवत असल्याच्या कारणाने एखाद्याने घरातील महिलेची हत्या केल्यास त्याला कायद्याचे संरक्षण होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here