मुंबई: मुंबईतील येथील एका २३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. सोसायटीतील इमारतीत राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेचा घरात घुसून केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या महिलेच्या घराचा दरवाजा खुला होता. त्यावेळी त्याने घरात घुसून तिचा विनयभंग केला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मंगळवारी साधारण रात्रीचे अकरा वाजले होते. महिला घरात झोपली होती. घराचा दरवाजा खुला राहिला होता. त्यावेळी तरूण त्यांच्या घरात घुसला आणि त्याने महिलेचा विनयभंग केला. अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला रात्री ११ वाजता टीव्ही बघता बघता झोपी गेली होती. त्याचवेळी आरोपी त्यांच्या घरात घुसला आणि तिचा विनयभंग केला. साकिनाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार, आरोपीविरोधात कलम ३५४ आणि कलम ४५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आम्ही आरोपीला अटक केली आहे. त्याला गुरुवारी कोर्टात हजर केले असता, त्याला जामीन देण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here