मुंबईः दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री यांनी राज्यातील जनतेसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी दिवाळी व दिवाळी नंतरचे १५ दिवस महत्त्वाचे असल्याचं सांगंत प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनानंतर गानकोकिळा यांनीही हाच धागा पकडत एक ट्विट केलं आहे.

‘फटाक्यांच्या धुरामुळं करोना वाढू शकतो. आपण इतके महिने केलेली मेहनत एका क्षणात वाया जावू शकते. दिवाळीचे व दिवाळी नंतरचे पुढचे १५ दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. थंडी सुरू होतेय, विषाणू पुन्हा वाढतोय, त्यामुळं ही थोडी खबरदारी घेण्याची गरज आहे,’ असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. यावर लता मंगेशकर यांनीही ट्विट करत जनतेला उद्देशून एक संदेश दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर लता मंगेशकर यांनी एक ट्विट केलं. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संवाद साधताना जे सांगितलं, त्याची अंमलबाजवणी करणं खूप गरजेचं आहे, असं मला वाटतं. दिवाळीत कमीत कमी फटाके फोडा. प्रदुषणाला आळा घाला, प्रकाशाचे पर्व साजरं करा. दिवाळी साजरं करा. मास्क आवश्यक लावा. स्वतःची, कुटंबाची आणि समाजाची काळजी घ्या,’ असं आवाहन लता मंगेशकर यांनी केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?

‘प्रदुषण वाढल्यामुळं संसर्ग वाढला आहे. प्रदुषणामुळं करोनाचा विषाणू आपल्या श्वसन संस्थेंवर घातक परिणाम करतो. म्हणूनच माझी जनतेला नम्र विनंती आहे दिवाळीत प्रदुषण करणारे फटाके कमी करावेत. मला फटाक्यांवर बंदी घालायची नाहीये. पण आत्तापर्यंत तुम्ही जसं सगळं पाळलंत तसंच या पुढेही सहकार्य करावं. जर प्रदुषणामुळं हा विषाणू वाढत असेल तर दिवाळीत प्रदुषण करणारे फटाके टाळू शकतो का? यावर विचार करावा. तुम्ही मर्यादित स्वरुपात फटाके वाजवू शकता.’ सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यावर बंदी असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here