वाचा:
इथिओपिअन कार्गो विमान रियाधहून येथे जात होते. दरम्यान, विमानाच्या समोरच्या चाकातून मोठ्या प्रमाणात तेलगळती होत असल्याने विमान तातडीने मुंबईकडे वळविण्यात आले. आपत्कालिन स्थितीत विमानतळावर विमान उतरवण्यात आले. दुर्घटनेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन येथे तातडीने तीन बंब, दोन बचाव वाहने व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. मात्र वैमानिक तसेच सहा सदस्यांसह विमान सुखरुप खाली उतरविण्यात आले असून स्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.
वाचा:
‘फुल्ल इमर्जन्सी’ का जाहीर करावी लागली?
मुंबई विमानतळावर विमानांची वर्दळ मोठी असते. सध्या करोनामुळे मर्यादित विमानसेवा असली तरी विमानाचे इमर्जन्सी लँडिंग होत असल्याचे कळताच सगळ्यांचीच गाळण उडाली. रियाध येथून निघालेले हे विमान बेंगळुरूला जाणार होते. मात्र तेलगळती होत असल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान दाखवत विमान तातडीने मुंबईकडे वळवण्यात आले. मुंबई विमानतळाला तातडीने संदेश देण्यात आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विमानतळावर ‘फुल्ल इमर्जन्सी’ जारी करण्यात आली. त्याचा भाग म्हणून संभाव्य दुर्घटनेला तोंड देण्यासाठी सर्व सज्जता ठेवण्यात आली. मात्र, सुदैवाने तसा कोणताही बाका प्रसंग उभा राहिला नाही. वैमानिकाने आपलं सारं कसब पणाला लावत विमान सुखरूपपणे विमानतळावर उतरवले आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. आता पुढील सोपस्कार सुरू असून याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. तेलगळती आधीपासूनच होत होती की नंतर सुरू झाली याचीही चौकशी केली जाणार आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times