वाचा:
रोज आंदोलन करत आहेत. चार महिने झाले तरीही त्यांचे पगार झालेले नाहीत. एसटी कर्मचारी रोज मरणयातना भोगतोय. या कामगारांची कशी गोड होणार, यापैकी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी आजच्या संवादातून दिले नाही. केवळ सामंजस्य करार करून चालणार नाहीत. त्या कराराची अंमलबजावणी जलद गतीने होताना दिसत नाही. शहरातून ग्रामीण भागामध्ये जे चाकरमानी गेले, त्यांचं भविष्य काय? याचा विचारविनियम होताना दिसत नाही. तसेच याबाबत मुख्यमंत्री संवादात काहीही बोलले नाहीत असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
वाचा:
मुख्यमंत्र्यांनी केवळ भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिरांबाबत मुख्यमंत्र्यांनी ठोस असं काहीच सांगितलं नाही. त्यामुळे त्यांचा संवाद हा केवळ ‘बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात’ आहे, असं म्हणावं लागेल असेही दरेकर यांनी सांगितले. महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यामधील एका महिलेचे डोळे नराधमांनी फोडले, त्यावर मुख्यमंत्र्याचे भाष्य नाही. राज्यातील सर्व मुद्द्यांवर त्यांनी बोलण्याची आवश्यकता होती, पण तसं झालं नाही. विनाअनुदानित शिक्षक पगारापासून वंचित आहेत, कोविडच्या डॉक्टरांनाही पगार मिळत नाही अशा जिव्हाळ्याच्या विषयावर मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत. केवळ भावनिक वातावरण करित सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला, असे दरेकर म्हणाले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times