खरगपूर: कागदाच्या बनवलेल्या आणि फक्त एकदाच वापरावयाच्या कपातूनonce usable paper cups पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. जर एखादा माणूस दिवसातून तीन वेळा चहा पीत असेल, तर त्याच्या शरीरात प्लास्टिकचे ७५००० सूक्ष्म कण जातात, असे आयआयटी, खरगपूरच्या () अभ्यासामधून उघड झाले आहे. (drinking from once usable paper cups is harmful to )

या संशोधनाचे नेतृत्व करणार्‍या आयआयटी खरगपूर येथील असोसिएट प्रोफेसर सुधा गोयल म्हणाल्या, की एकदाच वापरण्यायोग्य पेपर कपमध्ये शीतपेये पिणे एक सर्वसामान्य बाब झालेली आहे. या कपामध्ये असलेल्या प्लास्टिक आणि इतर हानिकारक पदार्थांमुळे गरम द्रव पदार्थ दूषित होत असल्याचे आमच्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. हे कप तयार करण्यासाठी, सहसा हायड्रोफोबिक फिल्मचा एक थर बसविला जातो. हा थर प्रामुख्याने प्लास्टिकचा बनलेला असतो. त्याच्या मदतीने, कपमधील द्रव टिकून राहतो. गरम पाणी घालल्यानंतर १५ मिनिटांत हा थर वितळण्यास सुरवात करतो.

गोयल पुढे म्हणाल्या की, आमच्या अभ्यासानुसार, एका कपात १५ मिनिटांसाठी १०० मिली गरम द्रव पदार्थ ठेवल्यास त्यात २५००० मायक्रॉन आकाराचे प्लास्टिकचे सूक्ष्म कण विरघळतात. याचा अर्थ असा की दररोज तीन कप चहा किंवा कॉफी पिणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्लास्टिकचे ७५००० सूक्ष्म कण जातात. हे कण डोळ्यांनी दिसत नाहीत. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

क्लिक करा आणि वाचा-

पर्यावरण अभियांत्रिकी व व्यवस्थापनाचा अभ्यास करणारे अनुजा जोसेफ आणि वेद प्रकाश रंजन यांनी गोयल यांना या संशोधनात मदत केली आहे. आयआयटी खरगपूरचे संचालक वीरेंदर के. तिवारी म्हणाले की, धोकादायक जैव-उत्पादने आणि पर्यावरणीय प्रदूषकांच्या वापराला प्रोत्साहन देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. आम्ही प्लास्टिक कप आणि ग्लासांच्याऐवजी ज्यांचा एका वेळेसच वापर होतो, अशा कप आणि ग्लासेसचा वापर करणे सुरू केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here