मुंबई: प्रसिद्ध चित्रपट निर्माते फिरोझ नाडियादवाला यांची पत्नी शबाना सईद यांना एनसीबीने अटक केली आहे. घरातून गांजा जप्त करण्यात आल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली असून फिरोझ नाडियादवाला यांनाही समन्स जारी करण्यात आले आहे. ( Arrests Firoz Nadiadwalas wife in connection to the )

फिरोझ नाडियादवाला यांची पत्नी शबाना यांच्याकडे दहा ग्रॅम गांजा सापडला आहे. दोन दिवसांपूर्वी एनसीबीने पडकलेल्या वाहिद ऊर्फ सुल्तान नावाच्या दलालाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने रविवारी छापा टाकत ही कारवाई केली. वाहिदने शबाना यांना गांजा पुरवला होता. त्यामुळे एनसीबीच्या पथकाने नाडियादवाला यांच्या घरी छापा टाकला असता गांजा आढळून आला. गांजा जप्त करत नंतर शबाना यांनाही अटक करण्यात आली आहे. दोन साक्षीदारांच्या समक्ष अटकेची कारवाई करण्यात आली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी या कारवाईबाबत अधिकृत माहिती दिली. या कारवाईसोबतच फिरोझ नाडियादवाला यांनाही समन्स जारी करण्यात आल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

– नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अंमली पदार्थांचा अवैध साठा केल्याप्रकरणी एकूण चार जणांना अटक केली आहे. या चौघांकडून ७१७ ग्रॅम गांजा, ७४.१ ग्रॅम चरस आणि ९५.१ ग्रॅम एमडी असा साठा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात रोकडही जप्त करण्यात आली आहे.

– शनिवारी संध्याकाळी एनसीबीने मुंबईत चार ठिकाणी छापे मारले. अटकेतील संशयित आरोपींकडून शबाना यांचे नाव पुढे आले होते. प्रथम शबाना यांची सखोल चौकशी करण्यात आली. त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात आली.

– ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींची नावे पुढे आली आहेत. गेल्याच आठवड्यात एनसीबीने अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेण्ड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचा भाऊ अगिसिलाओस याला अटक केली होती. अगिसिलाओस हा मूळचा दक्षिण आफ्रिकेतील आहे. त्यानंतर धर्मा प्रोडक्शनचा माजी कर्मचारी क्षितिज प्रसादलाही अटक करण्यात आलेली आहे.

– सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात ड्रग्ज कनेक्शन पुढे आल्यानंतर रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविकला अटक करण्यात आली. जवळपास एक महिन्यानंतर रियाला जामीन मिळाला तर शौविक अजूनही एनसीबीच्या कोठडीत आहे. दुसरीकडे ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत यांचीही चौकशी झालेली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here