वाचा:
राज्यात करोनाचे आकडे वेगाने खाली येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधित करताना याबाबत उल्लेखही केला. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेत जवळपास ५० हजार करोना बाधित रुग्ण आढळले व त्यांच्यावर वेळीच उपचार करता आले, असे नमूद करत करोना नियंत्रणात येण्यात हे अभियान महत्त्वाचे ठरले असे मुख्यमंत्री म्हणाले. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी बाळगण्याचे आवाहनही नागरिकांना केले. या सर्वात आजचे करोनाचे आकडेही दिलासा देणारे ठरले आहेत. नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मोठे असून दिवाळीचे काही दिवस दक्षता बाळगली गेली व नियम पाळले गेल्यास दिवाळीनंतर निर्बंध आणखी शिथील होऊ शकतात असे दिसत आहे.
वाचा:
आरोग्यमंत्री यांनी आजची आकडेवारी प्रसिद्ध केली. आज ८ हजार २३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर आजपर्यंत एकूण १५ लाख ७७ हजार ३२२ करोना बाधित रुग्णांनी या आजारावर मत करण्यात यश मिळवले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७१ टक्के एवढे झाले आहे. आज ५ हजार ९२ नवीन रुग्णांचे निदान झाले तर ११० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील मृत्यूंचा एकूण आकडा ४५ हजार २४० इतका झाला आहे. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९४ लाख ४० हजार ५३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १९ हजार ८५८ (१८.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ५१ हजार ३२१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ७ हजार ९१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचा:
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा १ लाखांच्या खाली आला असून त्यात दररोज काही हजारांची घट पाहायला मिळत आहे. आज हा आकडा ९६ हजार ३७२ इतका असून त्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जिल्ह्यातील करोनारुग्णांचा आकडा १७ हजारापर्यंत खाली आला आहे. गेले काही महिने पुणे जिल्ह्यात ठाण्यापेक्षाही करोना बाधित रुग्ण होते. आता पुणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा मुंबईपेक्षा कमी झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या १७ हजार २७९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर मुंबई पालिका हद्दीत १७ हजार ६०३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यातील हा आकडा १४ हजार ९८० इतका खाली आला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times