दिल्लीने यावेळी नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याता निर्णय घेतला. संदीप शर्माच्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जेसन होल्डरने मार्कस स्टाइनिसचा झेल सोडला. यावेळी मार्कस फक्त तीन धावांवर होता. या जीवदानाचा चांगलाच फायदा मार्कसने यावेळी उचचल्याचा पाहायला मिळाले. कारण जीवदान मिळाल्यावर मार्कसकडून तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली.
मार्कसला तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जीवदान मिळाले. त्यांनंतर मार्कसने याच षटकाच्या चौथ्या आणि पाचव्या षटकावर धडाकेबाज दोन चौकार लगावल्याचे पाहायला मिळाले. या दोन चौकारांनंतर मार्कस अधिकच आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. मार्कसचा झेल यावेळी होल्डरने सोडला होता. पण त्यानंतरच्या होल्डरच्या षटकात मार्कसने त्याचा चांगलाच समाचार घेतला. मार्कसने यावेळी २७ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटाकराच्या जोरावर ३८ धावांची खेळी साकारली. मार्कस आणि धवन यांची यावेळी ८६ धावांची सलामी दिली. हैदराबादचा फिरकीपटू रशिद खानने यावेळी मार्कसला त्रिफळाचीत करत दिल्लीला पहिला धक्का दिला.
मार्कस बाद झाल्यावर धवन चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळाला. धवनने यावेळी हैदराबादच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. मार्कस बाद झाल्यावर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. ही जोडी आता मोठी भागीदाारी रचेल, असे वाटत होते. पण अय्यरला यावेळी २१ धावांवरच समाधान मानावे लागले. हैदराबादच्या जेसन होल्डरने मनीष पांडेकरवी अय्यरला झेलबाद केले. अय्यर बाद झाल्यावर दिल्लीचा शिमरॉन हेटमायर हा फलंदाजीला आला. हेटमायर यावेळी चांगलाच आक्रमक दिसत होता. हेटमायरने यावेळी धमाकेदार फलंदाजी करत ़दिल्लीची धावसंख्या वाढवण्याची जबाबदारी चोख बजावली. धवन आणि हेटमायर या दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांची जोडी यावेळी चांगलीच जमलेली पाहायला मिळाली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times