बीजिंगः पूर्व लडाखमधील सुरू असलेला सीमावाद परस्पर ( ) वाटाघाटीद्वारे सोडवण्यास भारत आणि चीनमध्ये सहमती झाली आहे. या प्रकरणी अंतिम तोडगा निघत नाही होईपर्यंत आघाडीवर दोन्ही देश अधिक संयम राखतील. चिनी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने हे वृत्त दिले आहे.

भारताशी पुढे वाटाघाटी सुरू राहतील. ८ व्या फेरीच्या कोअर कमांडर बैठकीनंतर सीमेवरील तणाव कमी करण्याबाबत भारत आणि चीनने सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांनी हे संयुक्त निवेदन जारी केलं आहे. गैरसमज दूर करणं आणि आपापल्या सैन्याला संयम ठेवण्यास सांगतील. दोन्ही देश सीमेवरील लढाऊ वाहनं आणि सैनिक हटवतील, असं चीनच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

‘संवाद आणि संचार कायम ठेवून दोन्ही देश मतभेद वाढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत’, असं नॅशनल स्ट्रॅटेजी इन्स्टिट्यूटच्या रिसर्च विभागाचे संचालक कियान फेंग म्हणाले. चर्चेच्या ७ व्या आणि ८व्या फेरीच्या निकालांनी दोन्ही बाजूंनी परस्पर कराराद्वारे हा विषय निकाली काढण्यास हमी दिल्याचं चीनी विश्लेषकांनी सांगितलं.

चीनचा हा दावा

चीनने भारताइतकेच सैन्य सीमेवर तैनात केले आहे. हिवाळ्याच्या कालावधीत युद्ध पटले तर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) भारतीय सैन्यावर भारी पडेल, असा दावा ग्लोबल टाईम्सने अधिकृत सूत्रांच्या माहितीवरून केला आहे.

आघाडीच्या चौक्यांवर शांतता राखण्यासाठी सहमती

दोन्ही देश चर्चेद्वारे हा वाद मिटवण्यावर सहमत झाले आहेत. आपल्या उच्च अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. तसंच, एलएसीवर तैनात असलेल्या सैन्यात होणारा कोणताही गैरसमज दूर करण्याची व्यवस्था केली जाईल, असं संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं.

गेल्या सहा महिन्यांपासून चीनच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांत तणावाची स्थिती आहे. १४-१५ जूनच्या रात्री दोन्ही देशातील सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष संघर्ष झाला. यात २० भारतीय जवान शहीद झाले आणि चीनचे ४० हून अधिक सैनिक मारले गेले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here