ठाणे : राज्यात करोनाचा आलेख उतरता असून रुग्णांची संख्या कमी होत आहे हे चांगले लक्षण आहे. परंतु, जनतेने बेपर्वाई बाळगू नये. योग्य ती खबरदारी घ्यावी. प्रत्येकाने आपली जीवनशैली बदलावी आणि शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे. (CM On )

वाचा:

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने झालेल्या ठाणे जिल्हयातील कल्याण आर्ट गॅलरी येथील कोविड रुग्णालयाचा आणि टिटवाळा येथील कोविड रुग्णालयाचा ई-लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री ठाकरे यांच्याहस्ते पार पडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. इतर देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असताना आपण सावध रहाणे आवश्यक आहे. राज्यातील महामारीची लाट आपण एकत्रितपणे रोखली पाहिजे. विशेषत: दिवाळीच्या उत्सवात अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

वाचा:

ठाणे जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे उल्लेखनीय काम झाले आहे. यासाठी जिल्हा प्रशासन व नागरी संस्थांचे कौतुक करून यापुढेही योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी केल्या. फेरीवाले, रिक्षाचालक, टॅक्सी चालक, दुकानदार इत्यादींसह जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची वारंवार तपासणी केल्याने करोनाला आळा घालणे शक्य आहे, असे नमूद करतानाच शासकीय कार्यालयात अभ्यागतांना भेटण्यासाठी मोकळ्या जागेत अतिरिक्त सुविधा करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. दीपोत्सवानंतर काही धार्मिक मार्गदर्शक सूचना घेऊन प्रार्थनास्थळे उघडण्याच्या संदर्भात निर्णय देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. प्रदूषणामुळे करोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिल्लीचे उदाहरण त्यांनी दिले. दिल्लीसारखी परिस्थिती टाळण्यासाठी नागरिकांनी साथ द्यावी. राज्यात कमी करण्यासाठी हातभार लावावा आणि या दिवाळीत फटाके टाळावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

वाचा:

पालकमंत्री यांनी सांगितले, रुग्णांसाठी अगदी कमी कालावधीत उत्कृष्ट दर्जाची रुग्णालये उभारण्यात आली आहेत. टीमवर्कच्या बळावर हे शक्य झाले. अद्ययावत सुविधा ठाणे जिल्ह्यात विविध मनपांच्या माध्यमातून उभारण्यात आल्या आहेत. आज जिल्ह्यात एकही रुग्ण बेडसाठी वंचित राहणार नाही यांची खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा कायमस्वरूपी करण्याचा प्रयत्न राहील, असेही शिंदे यांनी सांगितले. भिवंडी तालुक्यासाठी हॉस्पिटलची आवश्यकता आहे. त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी केले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोविड काळात मतदारसंघात केलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. मनपा आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी कोरोनाकाळात मनपाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here