गेली अनेक वर्ष अर्थ मंत्रालयाकडून हा रिवाज पाळला जात आहे. एका मोठ्या कढईमध्ये हलवा तयार केला जातो. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री, अर्थराज्यमंत्री, अर्थ सचिव यांच्या उपस्थित सर्वांचे हलव्याने तोंड गोड करून अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात केली जाते. कोणत्याही महत्वाच्या कामाची सुरुवात ही गोडधोड करून करावी, अशी भारतीय संस्कृती आहे. त्यानुसार अर्थ मंत्रालयाकडून हा रिवाज पाळला जात आहे. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये अर्थसंकल्पाची छपाई केली जाते. ही प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अर्थ मंत्रालयात इतरांना प्रवेश दिला जात नाही.
येत्या १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. यंदा सीतारामन दुसऱ्यांदा बजेट सादर करतील. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरु होणार असून ते ११ फेब्रुवारीपर्यंत चालू राहील. दुसऱ्या टप्प्यात २ मार्च ते ३ एप्रिल या काळात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा असेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times