कॅचेस विन्स द मॅचेस, अशी क्रिकेटमध्ये एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय या सामन्यात आला. या सामन्यात एक झेल सुटला आणि त्यानंतर सामन्यात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. हा झेल सुटला तो दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर मार्कस स्टॉइनिसचा. या सामन्यात हा झेल सुटला आणि त्यानंतर सामना बदलल्याचे पाहायला मिळाले. हा झेल सुटल्यावर हैदराबादच्या संघाचे मानसीक खच्चीकरण झाल्याचे पाहायला मिळाले, तर दुसरीकडे दिल्लीचा संघ चांगलाच आक्रमक झाला आणि त्यांनी सामना जिंकण्याकडे कूच केली.
संदीप शर्माच्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जेसन होल्डरने मार्कस स्टाइनिसचा झेल सोडला. यावेळी मार्कस फक्त तीन धावांवर होता. या जीवदानाचा चांगलाच फायदा मार्कसने यावेळी उचचल्याचा पाहायला मिळाले. कारण जीवदान मिळाल्यावर मार्कसकडून तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. या जीवदानानंतर मार्कसने हैदराबादच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला आणि त्यांना निष्प्रभ केल्याचे पाहायला मिळाले.
मार्कसला तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जीवदान मिळाले. त्यांनंतर मार्कसने याच षटकाच्या चौथ्या आणि पाचव्या षटकावर धडाकेबाज दोन चौकार लगावल्याचे पाहायला मिळाले. या दोन चौकारांनंतर मार्कस अधिकच आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. मार्कसचा झेल यावेळी होल्डरने सोडला होता. पण त्यानंतरच्या होल्डरच्या षटकात मार्कसने त्याचा चांगलाच समाचार घेतला. मार्कसने यावेळी २७ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटाकराच्या जोरावर ३८ धावांची खेळी साकारली. मार्कस आणि धवन यांची यावेळी ८६ धावांची सलामी दिली.
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आजच्या सामन्यात विजय मिळवत पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. आजच्या क्वालिफायर-२ या सामन्यात दिल्लीने हैदराबादवर १७ धावांनी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. आता अंतिम फेरीत दिल्लीचा सामना मुंबई इंडियन्सबरोबर १० नोव्हेंबरला होणार आहे. दिल्लीच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलगा करताना हैदराबादच्या केन विल्यम्सनने एकाकी झुंज दिली. केनने यावेळी अर्धशतक झळकावले खरे, पण त्याला हैदराबादला विजय मिळवून देता आला नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times