वाचा:
सातारा येथील अभिजीत बिचुकले आणि सागर भिसे या दोन उमेदवारांनी पुणे विभाग पदवीधर मतदार संघासाठी आपापले अर्ज भरले आहेत. पाच नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. १२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. अर्जांची छाननी १३ नोव्हेंबरला होणार असून, १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. या निवडणुकीसाठी एक डिसेंबरला मतदान, तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. यांच्या अध्यक्षतेखाली या मतदारसंघांच्या नोडल अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (दि. ९) रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयाजित करण्यात आली असल्याचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी सांगितले.
वाचा:
आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध लढले होते!
अभिजीत बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढल्या आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील वरळी मतदारसंघात ते आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध निवडणुकीत उतरले होते. या लढतीमुळे बिचुकले अधिकच चर्चेत आले होते. मुख्य म्हणजे बिचुकले यांना वरळीत अवघी ७८१ मते मिळाली होती. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत तर त्यांना भोपळाही फोडता आला नव्हता. तेव्हा वरळी आणि सातारा अशा दोन मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती. दोन्ही मतदारसंघात मिळून त्यांना फक्त १५४० मतं मिळाली होती. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत बिचुकले यांनी पत्नी अलंकृता यांना उतरवले होते. विशेष म्हणजे अलंकृता यांनी १६४५ मते म्हणजेच बिचुकले यांच्यापेक्षा जास्त मते मिळवली होती. आता बिचुकले पुणे पदवीधर मतदारसंघात नशीब आजमावत असून तिथे त्यांना किती मते मिळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वाचा:
औरंगाबादमध्ये भाजपात अंतर्गत धुसफूस
औरंगाबाद: औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघात भाजपने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. प्रचार कार्यालयात त्यांच्या नावाचे फलकही तयार असून केवळ घोषणा बाकी आहे. अंतर्गत धुसफूस असल्याने थेट प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करत त्यांची उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times