नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा सुरू होण्याआधीच चर्चेत आला आहे. संघ निवडीवरून वाद झाला. त्याच बरोबर काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे ते या दौऱ्याला मुकले आहेत. रोहित शर्माचा दुखापतीमुळे समावेश झाला नाही. पण आता तो दुखापतीतून सावरला आहे आणि ऑस्ट्रेलियाला जाण्याची शक्यता आहे. आयपीएल सुरू असताना काही भारतीय खेळाडू जखमी झाले. ज्यामुळे त्यांचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विचार झाला नाही. यात इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांचा समावेश होता. या यादीत आणखी एकाचा खेळाडूचा समावेश झाला आहे.

वाचा-

आयपीएलच्या १३व्या हंगामात सनरायजर्स हैदराबादकडून स्फोटक खेळी करणारा क्वालिफायल २ मध्ये देखील खेळू शकला नाही. यामुळे आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. साहाच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला धक्का बसू शकतो. कसोटी संघात साहासोबत ऋषभ पंतचा समावेश केला आहे. कसोटी मालिका सुरू होईपर्यंत जर साहाची दुखापत ठिक झाली नाही तर त्याच्या ऐवजी अन्य विकेटकिपरला ऑस्ट्रेलियाला पाठवले जाऊ शकते. साहाच्या दुखापती संदर्भात अद्याप कोणतेही अपडेट आले नाहीत.

वाचा-

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला ३ टी-२०, ३ वनडे मालिका खेळायची आहे त्यानंतर कसोटी मालिका होणार आहे. पहिली टी-२० लढत २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

वाचा-

वनडे मालिकेतील पहिले दोन सामने सिडनी मैदानावर २७ आणि २९ नोव्हेंबर रोजी होईल. तर अखेरची लढत ओव्हर मैदानावर होणार आहे. कसोटी मालिका १७ डिसेंबरपासून सुरू होईल. ही लढत डे-नाइट असेल. त्यानंतर २६ डिसेंबर रोजी बॉक्सिंग डे कसोटी मॅच होणार आहे. तर नव्या वर्षात ७ जानेवारीपासून तिसऱ्या कसोटीला सुरूवात होईल. अखेरची कसोटी १५ जानेवारी रोजी ब्रिसबेन येथे होणार आहे.

वाचा-

कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार),मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि मोहम्मद सिराज.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here