लखनऊः महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार ( ) आणि उत्तर प्रदेशातील ( uttar pradesh ) योगी सरकारमध्ये शाब्दीक चकमक सुरू आहे. पालघरमध्ये साधूंचे हत्याकांड, अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा असो की आताचा फिल्म सिटाचा ( ) दोन राज्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आव्हान युपीच्या उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारले आहे. राज्य सरकार प्रस्तावित फिल्म सिटीवर अतिशय जोमाने काम करत आहे. राज्याला मुंबईपेक्षाही मोठी फिल्म सिटी मिळणार आहे, असं युपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य ( ) म्हणाले.

उत्तर प्रदेशात नोएडामध्ये फिल्म सिटी झाल्यावर राज्यातील कलाकारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सध्याचे सरकार नव्या प्रस्तावित फिल्म सिटीवर तातडीने काम करत आहे. फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलने उत्तर प्रदेशला मुंबईहून मोठी फिल्म सिटी देण्यास तयार आहे. फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे कार्यालय झाल्याने सर्व प्रकारची माहिती मिळेल आणि चित्रपटांमध्ये रस असणार्‍या कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल, असं
फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलच्या अध्यक्षांच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मौर्य म्हणाले.

राज्याचे कायदामंत्री ब्रिजेश पाठक यांनी फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांचं अभिनंदन केलं. फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे कार्यालय झाल्याने राज्यात काम करणाऱ्या कलाकारांना चांगलं काम करण्याची संधी मिळेल, असं पाठक म्हणाले. सरकार उत्तर प्रदेशातील चित्रपटसृष्टीशी संबंधित कामांकडे चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करेल. राज्यात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत आणि सर्वात मोठं राज्य असल्याने इथं ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाण असल्याने निर्माते आणि दिग्दर्शकांना अधिक सुलभ होईल, असं राजू श्रीवास्तव म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here