नवी दिल्लीहून नवी दिल्ली-सियालदा एक्स्प्रेसमध्ये मोहम्मद अन्वर आणि रफिक हे शुक्रवारी चढले. प्रवासादरम्यान डब्यात बिहार निवडणुकीची चर्चा सुरू झाली. रफिक लालू प्रसाद यादव आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यांचा समर्थक. तर मोहम्मद अन्वर हे नितीश कुमारांचे समर्थक होते. तेजस्वी यादव आणि नितीश यांच्या समर्थकांनी आपापल्या आवडत्या नेत्यांचं कौतुक करण्यास सुरवात केली. इतर प्रवासीही या चर्चेत सहभागी झाले.
दोघेही पश्चिम बंगालमधील रहिवासी
रफिक आरजेडीचे कौतुक करत होते आणि अन्वर हे जेडीयूचे कौतुक करत होते. दोघांमधील चर्चा वादापर्यंत गेली आणि त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. यामुळे संपूर्ण डब्यात गोंधळ उडाला. ट्रेन शुक्रवारी रात्री उशिरा कानपूर सेंट्रल स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचली. तिथे दोघांनाही खाली उतरवण्यात आलं. दोन्ही प्रवाशांमध्ये कशावरून तरी भांडण झालं. हे दोन्ही तरुण पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. आणि शांतता भंग केल्यामुळे त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे, असं जीआरपी इन्स्पेक्टर राममोहन रॉय यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times