म. टा. वृत्तसेवा,

निसर्गाने भरभरून नटलेले, जव्हार हे नैसर्गिक आहे. जव्हारला ऐतिहासिक, सांस्कृतिक, कला व परंपरेचा समृद्ध वारसा आहे. मात्र, त्यांचा विकास झालेला नाही. म्हणूनच जव्हारला ‘ब’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी अनेक दशकांपासून करण्यात येत होती. अखेर गुरुवारी सरकारने जव्हारला ‘ब’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेत जव्हारकरांना दिवाळी भेट दिली आहे. सरकारच्या धोरणानुसार ‘ब’ दर्जाच्या पर्यटनविकासासाठी प्रतिवर्षी पाच कोटींचा निधी मिळणार असल्याने, आता जव्हारच्या विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.

जव्हार हे नैसर्गिक पर्यटनस्थळ आहे. येथे १२५ ते १५० मिमी पर्जन्य प्रमाण आहे. तर ते समुद्रसपाटीपासून १ हजार ७०० फूट उंचीवर आहे. येथे थंडीचे प्रमाणही जास्त असल्याने प्रतिमहाबळेश्वर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. जव्हारमध्ये जयविलास पॅलेस, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला शिरपामाळ, हनुमान पॉइंट, सनसेट पॉइंट, जुना राजवाडा, जयसागर धरण, विजयस्तंभ, दगडी बांधकामाचा सूर्यतलाव, जांभूळविहीर, फिल्टर हाऊस ही प्रेक्षणीय स्थळे आणि तालुक्यात दाभोसा व काळमांडवीसह अनेक धबधबे आहेत. त्यामुळे प्रतिवर्षी पाच ते सहा पर्यटक येथे भेट देतात.

जव्हारला ‘ब’ पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, ही अनेक दशकांची मागणी होती. यासाठी परिषदेकडूनही अनेक वर्षे प्रयत्न सुरू होते. यापूर्वीचे नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच आताचे नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, दीपक कांगणे, कुणाल उदावंत, संगीता अहिरे, स्वाती सोनवणे व इतर सर्व नगरसेवकांनी शर्थीचे प्रयत्न करून जव्हारच्या पर्यटनस्थळाची मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. ेच्या स्थापनेला १०१ वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘ब’ दर्जा मिळावा म्हणून पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी २९ जानेवारी २०२०ला सरकारकडे शिफारस केली होती. त्याची दखल घेत महाविकास आघाडी सरकारने गुरुवारी जव्हारला ‘ब’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेऊन परिपत्रक जारी केले.

जव्हारला ‘ब’ पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, ही अनेक वर्षांची मागणी होती. त्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार आणि पर्यटन विकासमंत्री आदित्य ठाकरे यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून, जव्हारला हा दर्जा देण्यास मंजुरी दिली. आता जव्हारचा महाबळेश्वर आणि माथेरानच्या धर्तीवर विकास करणार आहे.

– चंद्रकांत पटेल, नगराध्यक्ष, जव्हार नगरपरिषद

जव्हार ‘क’ दर्जाचे पर्यटन स्थळ होते. त्यामुळे पर्यटन विकासासाठी भरीव निधी येत नव्हता. आता ‘ब’ दर्जा मिळाल्याने सरकारचा पर्यटन विकासाचा ‘बांधील निधी’ मिळणार आहे. सरकारी योजनाही येतील, तर आदिवासी संस्कृतीची माहिती पर्यटकांना मिळावी म्हणून आम्ही ‘आदिवासी सृष्टी’ हा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे.

– अॅड. प्रसाद बोरकर, मुख्याधिकारी, जव्हार नगरपरिषद

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here