म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली असून, यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही उमेदवारी जाहीर केली असून, पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्षाकडून घोषित करण्यात आलेली ही पहिलीच उमेदवारी आहे.

मनसेचा आक्रमक चेहरा अशी ओळख असलेल्या रूपाली पाटील पक्ष स्थापनेपासून मनसेत कार्यरत आहेत. त्यांनी पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे. सध्या त्या मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही कसबा पेठ मतदारसंघातून त्या इच्छुक होत्या. मात्र, पक्षाने शहराध्यक्ष अजय शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती.

दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघासाठी एक डिसेंबर रोजी मतदान होणार असून, तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, १२ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवारांच्या अर्जांची छाननी १३ नोव्हेंबरला होणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत १७ नोव्हेंबरपर्यंत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here