सातारा: ” ही टीव्ही मालिका तडकाफडकी सोडणारी अभिनेत्री व ज्येष्ठ अभिनेत्री यांच्यातील वाद खासदार यांच्या दरबारात गेला आहे. अलका कुबल यांनी स्वत: साताऱ्यात उदयनराजे यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली.

एका सहकलाकाराने आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्यानंतर हा वाद सुरू झाला होता. प्राजक्ता गायकवाड हिनं मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांच्याकडं तक्रारही केली होती. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळं मी मालिका सोडल्याचा आरोप प्राजक्तानं केला होता. अलकाल कुबल यांनी तिचे आरोप फेटाळताना तिच्याबद्दल अनेक तक्रारी केल्या होत्या. ‘प्राजक्ता वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाण्यासाठी सतत सुट्टी मागायची. सेटवर उशिरा यायची. तिच्या उशिरा येण्यामुळं अनेकदा चित्रीकरणाला उशीर झालाय,’ असं अलका कुबल यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, प्राजक्तानं हे सर्व आरोप फेटाळले होते. उलट मला चार महिने केलेल्या कामाचे पैसे अद्याप मिळाले नसल्याचं तिनं सांगितलं. हा वाद पेटल्यानंतर प्राजक्ताच्या चाहत्यांनी अलका कुबल यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेचा उल्लेख एकेरी केल्यानंही त्यांच्यावर टीका होत होती.

वाचा:

या सगळ्या पार्श्वभूमीवर अलका कुबल यांनी रविवारी उदयनराजे यांची भेट घेतली. उदयनराजेंनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी आज भेट घेतली. काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासोबत काही विषयांवर झालेल्या वादाबद्दल चर्चा झाली. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्याशी देखील चर्चा केली. हा वाद लवकरच मिटवून पुन्हा एकत्र येऊन काम करावे ही इच्छा आम्ही व्यक्त केली,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here