म. टा. प्रतिनिधी, पुणे
पतीने आणून बायकोला बनविण्यास दिले; मात्र यासाठी दीड तास लागेल, असे उत्तर पत्नीने दिल्याने चिडलेल्या पतीने शिवीगाळ करून पत्नीचे दात पाडले. हा प्रकार भागात घडला असून, संबंधित पतीविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली आली.

दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. याबाबत एका ४० वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. प्रभाकरन नाडार (वय ४५) याच्याविरोधात दाखल केला आहे. तक्रारदार आणि आरोपी पती-पत्नी आहेत. दोन दिवसांपूर्वी प्रभाकरन दारू पिऊन मटन घेऊन घरी आला. आणि त्याने बायकोला मटन बनवून देण्यास सांगितले. हातात दुसरे काम असल्याने पत्नीने दीड तासाने मटन बनवून देते असे सांगितले.

मटन बनविण्यासाठी इतका वेळ का लागणार आहे, अशी विचारणा त्याने केली. बायको आपले ऐकत नसल्याचा राग आल्याने प्रभाकरनने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली. मारहाण करताना तोंडावर ठोसा मारल्याने पत्नीचे दात पडले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here