राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतील वॉर्डाला मुंबई महापालिकेचा सर्वात स्वच्छ वॉर्डचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुंबई महापालिकेने शहरातील सर्वात स्वच्छ महापालिका शाळा, रुग्णालयं आणि कार्यालयांचा आढावा घेतला होता. यात मुंबईतील वरळीतील हिंदुजा रुग्णालय सर्वात स्वच्छ रुग्णालय ठरले आहे. तर विटी इंटरनॅशनल शाळेला सर्वात स्वच्छ शाळेचा बहुमान मिळाला आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि शासकीय कार्यालयांमधील स्वच्छतेत वरळी वॉर्डाने पहिला क्रमांक पटकावल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केलं आहे.
आदित्य ठाकरेंच्या रुपाने ठाकरे कुटुंबातील पहिला व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरला. आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवत आमदारकी मिळवली. त्यानंतर आदित्य यांच्याकडे मंत्रिमंडळात राज्याच्या पर्यटन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महापालिकेच्या पुरस्काराच्या घोषणेनंतर मतदार संघातील शिवसैनिकांनी आनंद साजरा केला. तसेच पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन पाहणाऱ्या पालिकेच्या सफाई कामगारांचे आभार व्यक्त केले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times