भारतीय जनता पक्षात सातत्यानं डावललं गेल्यामुळं नाराज झालेल्या एकनाथ खडसे यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीत आल्यापासून खडसे यांनी भाजपच्या विरोधात रान उठवणं सुरू केलं आहे. विशेषत: देवेंद्र फडणवीसांना ते लक्ष्य करत आहेत. फडणवीस यांच्यामुळंच आपलं मुख्यमंत्रिपद गेलं व भाजपमध्ये आपल्याला अडगळीत फेकलं गेलं, असा खडसे यांचा आरोप आहे.
वाचा:
दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांसमोर बोलताना खडसे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष्य केलं होतं. त्यावेळी त्यांनी फडणवीसांच्या जातीचा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली. ‘नाथाभाऊ दिलदार आहे. मी भल्याभल्यांना दोन देतो, मग एका ब्राह्मणाला दान द्यायला काय हरकत आहे. म्हणून मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केलं,’ असं ते म्हणाले होते.
वाचा:
खडसेंच्या याच वक्तव्याला ब्राह्मण महासंघानं आक्षेप घेतला आहे. या वक्तव्याबद्दल खडसेंनी माफी मागावी, अन्यथा पुण्यात आल्यानंतर त्यांना जाब विचारण्यात येईल,’ असं ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष यांनी म्हटलं आहे. ‘दान देण्यासाठी मुळात ती गोष्ट आपल्या अधिकारात असायला हवी. एवढंही ज्ञान खडसेंना नाही,’ याबद्दल दवे यांनी आश्चर्य देखील व्यक्त केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निवेदन
खडसे यांच्या वक्तव्याचा निषेध करत दवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील आमदारांना निवेदन दिलं आहे. राष्ट्रवादीनं खडसेंना समज न दिल्यास पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही महासंघानं दिला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times