अहमदनगर: जामखेड येथील सृष्टी शरद शिंदे या चौथीतील विद्यार्थिंनीने दिलेले गिफ्ट कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार यांना चांगलेच भावले आहे. हे गिफ्ट मिळाल्यानंतर सृष्टी व तिच्या भावासोबतचा फोटो ट्विटवर शेअर करताना, ‘अशा आपुलकीच्या शुभेच्छा खूप कमी जणांच्या नशिबी असतात, थँक यू सृष्टी दिदी’ अशी कमेंटही त्यांनी त्यावर दिली आहे. सृष्टीने दिलेल्या कार्डचा व्हिडिओ देखील त्यांनी शेअर करताना तिच्या कल्पकतेचे कौतुक केले आहे.

आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस २९ सप्टेंबर रोजी असतो. पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जामखेड येथील हिने रोहित पवार यांचे वेगवेगळे प्रासंगिक फोटो वापरून एक आकर्षक बर्थ डे कार्ड तयार केले होते. हे कार्ड सृष्टी हिने नुकतीच रोहित पवार यांची जामखेड येथे भेट घेऊन त्यांना दिले. याबाबतची माहितीच रोहित पवार यांनी ट्विटवर देताना सृष्टीचे आभार मानले आहे.

वाचा:

‘जामखेडमध्ये सृष्टी शरद शिंदे या चौथीतील विद्यार्थिंनीने माझ्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे प्रासंगिक फोटो वापरून एक आकर्षक व अफलातून बर्थ डे कार्ड तयार केलं होतं. तिचा छोटा भाऊ धर्मराजसोबत तिने ते मला भेटं दिलं. अशा आपुलकीच्या शुभेच्छा खूप कमी जणांच्या नशिबी असतात. थँक यू सृष्टी दिदी ! ‘ असे रोहित पवार यांनी म्हंटले असून सृष्टीने दिलेल्या कार्डचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. पवार यांचे वेगवेगळे फोटो वापरून तयार करण्यात आलेले हे कार्ड राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कौतुकाचा विषय ठरू लागले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here